Rohit

Rohit

Wednesday, October 5, 2011

ROHiT K@MBLE

चित्रकला म्हणजे नक्की काय? 

कदाचित..
चित्रकला म्हणजे गायतोंडेंची कित्येक कोटींना विकली गेलेली पेंटिंग्ज?
की दिल्लीत निजामगंजच्या बरसातीत अखेरच्या एकाकी  दिवसांत त्यांनी चितारलेली सिलिंगफॅनची तीन पाती?
 हुसेनचे करोडोंचे घोडे? की त्याला परागंदा करणार्‍या नग्न देवतांचे कॅनव्हास?
रवि वर्माची धनिकांच्या खाजगी संग्रहात बंदिस्त झालेली दमयंती? की त्याच्या सरस्वतीच्या चित्रामागचा गूढ चेहरा?
भास्कर कुलकर्णींनी जगासमोर आणलेली वारली आर्ट आणि मधुबनी? की त्याच मधुबनी गावामधे त्यांचे उपेक्षेत मरुन जाणे?
चित्रकला म्हणजे चिमुलकरांच्या तरल स्व्प्नांतून उमटलेले गूढ आकार बहुतेक. किंवा त्या तरल आभासी आकारांनी वेडे झालेले चिमुलकर स्वतःसुद्धा.
जेजेच्या आवारातली दाट, गर्द झाडी. लयबद्ध शिल्पं, भव्य सिलिंगमधून सांडणारा प्रकाश, उंच खिडक्यांच्या कमानी, नक्षीदार खांब आणि त्यांच्या तितक्याच नक्षीदार सावल्या मिरवणारे लांबलचक पॅसेज.. जेजेचं १५० वर्षं पुराणं सौंदर्य. . .
चित्रकला याही पेक्षा काही वेगळी असू शकते?
आणि मग अजिंठ्याच्या पद्मपाणीने सांगितलेली चित्रकलेची कहाणी? अल्टामिराच्या त्या तीन उन्मत्त बैलांनीही चित्रकलेचा अर्थ सांगितलेला असणारच.
रोजच्या, आजूबाजूच्या आयुष्यातलं.. जहांगीरच्या पायरीवरचं, एन्सिपिए, ताओ आर्ट गॅलरीच्या प्रदर्शनातलं..
चित्रकलेचा पसारा तर आपलं अवघं जगणंच व्यापून बसलेला आहे. . . .